नाशिकः जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरूच, ११ महिन्यांत ३४३ जणांच्या आत्महत्या


वेगवान नाशिक

नाशिकः गेल्या कोरोनाच्या काळात मानसिक तणाव वाढल्याचं चित्र हे नाशिक शहरात दिसून आलं होतं. मात्र, कोरोनाच्या नंतर देखील बहुतांश तरूण मानसिक तणावाखाली असून व्यसनाधीनता आणि मानसिक तणावातून जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या ११ महिन्यांत ३४३ व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रकार उघडकीस आले आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस

यामध्ये सर्वाधिक प्रमाण १४ ते ३० वयोगटातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हि आकडेवारी जाहीर करण्यात आली असून मागील दोन वर्षात करिअरची चिंता देखील तरूणांना मनात वाढीस लागल्याने आत्महत्या होत असल्याचं समोर आलं आहे.

त्यात सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात असून, अनेकांची लग्न जुळत नसल्याचे वास्तव आहे. अशातच या सगळ्यातून मानसिक ताणतणाव वाढत असून शिवाय अनेक दिवसांपासून बळावलेला आजार देखील आत्महत्येचे कारण ठरू शकतो. काही वेळा कौटुंबिक वादातून आत्महत्या घडल्याचे प्रकार समोर आले. तर विशेष म्हणजे या वयात प्रेम ही संकल्पना मनात रुंजी घालत असते. अशावेळी प्रेमभंगातून काही आत्महत्या झाल्याचे देखील घडले आहे.

त्यामुळे नाशिक शहरात आता चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत पोलिसांच्या वतीने हि माहिती देण्यात आली आहे.

Share Market बाजारात तेजी, सेन्सेक्स ६८ अंकांनी तर निफ्टी १९ अंकांच्या वर उघडला


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *