वेगवान नाशिक
सध्या क्रिकेट विश्वात कसोटी सामने खेळवले जात असून भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला गेला. तर या मालिकेतील पुढील सामना २२ डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळल्या जाणार आहे.परंतु या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस
वृत्तानुसार बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही.
या बॅंकेच्या व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
तसेच रोहित शर्मा फलंदाजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे परंतु क्षेत्ररक्षणाबाबत थोडा चिंतेत आहे. म्हणूनच आता शर्मा हा जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेत टीम इंडियात पुनरागमन करताना दिसणार असून ही आगामी मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
या स्टॉकने गुंतवणुकदाराचे 20 वर्षात 3500 रूपयाचे झाले 1 कोटी रुपये