महत्वाची बातमी! या तारखेपासून बँकाशी संबंधितीत नियमात होणार महत्वाचे बदल


वेगवान नाशिक

तुमचे जर बँकेत लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत नवीन वर्षाला सुरूवात होणार असून त्याआधीच बँक संबंधितं महत्त्वाचे नियम जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षाची वाट पाहत असणा-यांकरता महत्वाचं म्हणजे बँकाशी संबंधितीत नववर्षात काही महत्वाचे बदल होणार आहेत. तर यामध्ये 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकरशी संबंधित अनेक नियम बदलणार असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुधारित अधिसूचनेनुसार, बँका लॉकरच्या बाबतीत मनमानी करू शकणार नाहीत आणि ग्राहकाचे नुकसान झाल्यास त्यांची जबाबदारी सोडू शकणार नाहीत.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस

तसेच एसबीआय आणि पीएनबीसह इतर बँकांनी ग्राहकांना एसएमएसद्वारे  नवीन नियमांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. पीएनबी ग्राहकांना मिळालेल्या संदेशात असं म्हटलं आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लॉकर एग्रीमेंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी लागू केला जाणार आहे. म्हणूनच लॉकरमध्ये अनधिकृत एक्सेस केल्यास दिवस संपण्यापूर्वी बँका ग्राहकांचा नोंदणीकृत मेल एड्रेस आणि मोबाइल क्रमांक तारीख, वेळ आणि काही आवश्यक गोष्टींबद्दल माहिती देणार आहे.

Share Market बाजारात तेजी, सेन्सेक्स ६८ अंकांनी तर निफ्टी १९ अंकांच्या वर उघडला

तसेच SBI च्या मते, बँक लॉकरचे शुल्क क्षेत्रफळ आणि लॉकरच्या आकारानुसार 500 ते 3,000 रुपयांपर्यंत असते. मोठी शहरे आणि महानगरांमधील बँका लहान, मध्यम, मोठ्या आणि अतिरिक्त मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी 2,000 रुपये, 4,000 रुपये, 8,000 रुपये आणि 12,000 रुपये वार्षिक आकारण्यात येतील. तर आरबीआयच्या नवीन मानकानुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरच्या कोणत्याही वस्तूंचं नुकसान झाल्यास, बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल.

तसेच भूकंप, पूर, वादळ इत्यादी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकरमधील सामग्रीचं नुकसान झाल्यास, बँक त्याची भरपाई करण्यास जबाबदार राहणार नाही. याशिवाय, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर ग्राहकाच्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असेल तर बँक ग्राहकांना कोणतेही पैसे देणार नाही. त्यानंतर आरबीआयने म्हटले आहे की, बँकांना रिकाम्या लॉकरची यादी आणि लॉकरचा प्रतीक्षा यादी क्रमांक प्रदर्शित करावा लागेल.

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *