वेगवान नाशिक
राज्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये हे अधिवेशन पार पडत असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून विविध मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस
त्यानंतर मविआ आघाडीने सरकारवर सीमाप्रश्नावरून आक्रमक टीका केली असल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले.
त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्नांची सरबत्ती करत सरकारवर निशाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर देत तुम्हाला मंत्री व्हायचंय का? अशी विचारणा करत एकप्रकारे शिंदे गटात येण्याचं सुनिल प्रभू यांना थेट ऑफरच दिल्याचं पहायला मिळालं.
त्यामुळे यावरून सभागृहात एकच चर्चेला उधाण आल्याचं दिसून आलं.
Share Market बाजारात तेजी, सेन्सेक्स ६८ अंकांनी तर निफ्टी १९ अंकांच्या वर उघडला