वेगवान नाशिक
राज्यात सध्या आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आल्याचे बघायला मिळाले. त्यात अजित पवार यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस
तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सांगली, सोलापुरातील गावांसदर्भात ट्विटमागे नेमकं कोण आहे, हेही लवकरच समोर येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
एकनाश शिंदे म्हणाले, अजित पवार यांनी जो मुद्दा मांडला आहे, तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तसे या मुद्द्यावर पहिल्यांदाच देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी केली असून गेल्या अनेक वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळे या बैठकीत आम्ही सीमावादाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतली होती. आणि तसेही महाराष्ट्रातील वाहनांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Share Market बाजारात तेजी, सेन्सेक्स ६८ अंकांनी तर निफ्टी १९ अंकांच्या वर उघडला
दरम्यान सीमावादाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. आधीच्या सरकारने बेळगावातील गावासांठी असलेल्या योजना बंद केल्या होत्या. आम्ही त्या योजना पुन्हा सुरू केल्या. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आम्ही सीमावासियांसाठी दोन हजार कोटींची योजना सुरू केली. मुळात सीमावासीयांच्या पाठिशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
महत्वाची बातमी! या तारखेपासून बँकाशी संबंधितीत नियमात होणार महत्वाचे बदल