बॅंकेच्या ग्राहकांना आता हि सेवा मिळणार मोफत


वेगवान नाशिक

बँक आपल्या ग्राहकांना सातत्याने  काही ना काही सेवा देत असते. त्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन यासारख्या दोन्ही सेवा बॅंक पुरवत असते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात. मात्र आता बँकेतील काही सेवा मोफत मिळणार आहे. जाणून घ्या त्या सेवा कोणत्या आहेत?

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस

तर बँका त्यांच्या ग्राहकांना मोफत एटीएम कार्ड, चेकबुक आणि ऑनलाइन सेवा यासारख्या सेवा मोफत देतात. तर दुसरीकडे काही सेवांवर शुल्क आकारलं जातं किंवा काही मोफत सेवांवरदेखील एका मर्यादेनंतर शुल्क आकारलं जातं. अशा परिस्थितीत, या सेवा वापरण्यापूर्वी या शुल्कांची माहिती असणं आवश्यक आहे. मात्र आता एका बँकेने 25 सेवांवर शुल्क आकारणे बंद केले आहे. त्यामुळे आता तुमची पैशांची बचत होणार आहे.

या महिन्यापासून या कंपन्यांचे मॉडेल्स होणार महाग

आता एका बँकेने आपल्या 25 सेवा ग्राहकांना मोफत देण्याची चर्चा केली असून 18 डिसेंबर रोजी स्थापना दिनानिमित्त, IDFC FIRST बँकेने बचत खात्यांवर शून्य शुल्क बँकिंगची घोषणा केली आहे. तसेच बँकेने बचत खात्यांशी संबंधित 25 सामान्यतः वापरल्या जाणार्‍या बँकिंग सेवांवर शुल्क माफ केले आहे जसे की शाखांमध्ये रोख ठेव आणि पैसे काढणे, तृतीय पक्षाचे रोख व्यवहार, डिमांड ड्राफ्ट, तात्काळ पेमेंट सेवा , नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. तसेच रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट , चेक बुक, एसएमएस अलर्ट, व्याज प्रमाणपत्रे, एटीएम व्यवहारांसाठी अपुरी शिल्लक, आंतरराष्ट्रीय एटीएम वापर इत्यादी सेवा देखील विनामूल्य उपलब्ध असतील, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच याचा फायदा सर्व ग्राहकांना होईल, विशेषत: ज्यांना कमी आर्थिक साक्षरता आहे. ज्यांना शुल्क आणि शुल्काची गणना करणे कठीण जाते अशा सर्वांना फायदा होणार आहे.

Share Market बाजारात तेजी, सेन्सेक्स ६८ अंकांनी तर निफ्टी १९ अंकांच्या वर उघडला

 

 

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *