वेगवान नाशिक
राज्यात सध्या हिवाळी अधिवेशानाला आजपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्याचे सगळेच पक्षनेते सज्ज झाले असून आपापले मुद्दे गाजवण्याची शक्यता आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लवासा प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला असून लवासा प्रकल्पात काही चुकलं असेल तर चौकशी करा, असं खुलं आव्हान राज्य सरकारला दिले आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस
दरम्यान विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्याआधी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला असून म्हणाले की, लवासा प्रकल्पात काही चुकीचं केलं असेल तर जनतेच्या समोर येऊ द्या. सर्व यंत्रणा तुमच्या हातात असून त्याची तुम्ही चौकशी करा.
तसेच गेल्या सहा महिन्यात चौकशी का झाली नाही? सहा महिने कमी कालावधी असतो का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे इतर मुद्द्यांवरून आता लवासा प्रकरणही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
Share Market बाजारात तेजी, सेन्सेक्स ६८ अंकांनी तर निफ्टी १९ अंकांच्या वर उघडला