वेगवान नाशिक
मनमाड : सध्या रेल्वे प्रशासनाची एक दिवसीय तिकीट तपासणी मोहिम सुरू असून विविध भागात हि मोहिम राबविण्यात आली आहे. खास करून या मोहिमेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने विभागाच्या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर एकूण ८६ रेल्वे गाड्यात कारवाई करण्यात आली असून प्रवाशांकडून २३ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आले आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणासाठी उत्तम दिवस
माहितीनुसार, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव ते धुळे, जलंब ते खामगाव विभागाची एक दिवसीय तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.
यामध्ये आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ८६ गाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यात नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा लागू होणार- एकनाथ शिंदे
तसेच यासाठी ३ अधिकारी, १८० तिकीट चेकिंग स्टाफ, ४५ वाणिज्य स्टाफ व ५५ आरपीएफ स्टाफ असे एकूण २८० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये ओपन डिटेल स्टाफ यांनी ३४१९ केसेस करून १९ लाख ९७ हजार ५६५ रुपये, स्टेशन स्टाफ यांनी २०३ केसेस करून १ लाख ५ हजार २७० रुपये, आणि अमेनिटी स्टाफ २९३ केसेस करून २ लाख २४ हजार २५१ रुपये वसूल करण्यात आले. असे एकूण ३९१५ केसेस करण्यात आल्या आहेत.
अजित पवारांचं लवासा प्रकरणावरून राज्य सरकारला आव्हान