वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव –
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावलभूत्तो झरदारी यांनी भारत देशाबद्दल विरोधी वक्तव्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह निंदनीय विधान केल्याबद्दल मनमाड शहर भाजपा व बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट ) यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी,भाजपा माथाडी सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार,शिवसेना नेते राजाभाऊ भाबड,शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे,महावीर ललवाणी,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा व्यापारी प्रकोष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी,सरचिटणीस सचिन लुनावत,आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत,ज्येष्ठ जिल्हा कार्य सदस्य उमाकांत राय,भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वातीताई मुळे, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ.सोनीताई पवार, मनमाड शहर सरचिटणीस नितीन परदेशी,एकनाथ बोडखे यांचे नेतृत्वामध्ये झालेल्या या पाकिस्तान विरोधी आंदोलनामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाकिस्तान व पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भूत्तो यांचे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.पाकिस्तान मुर्दाबाद,बिलावल भूत्तो मुर्दाबाद,देश का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, भारत माता की जय,वंदेमातरम,नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ है! अशा घोषणा देण्यात आल्या.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भूत्तो यांचे प्रतिमेला चप्पल जोडे मारत प्रतिमेचे सार्वजनिकरित्या दहन करण्यात आले.
या आंदोलन प्रसंगी भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन,केशवराव पाटोळे,भाजपा भटके विमुक्त सेलचे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा,भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा चिटणीस गौरव ढोले,भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस बुऱ्हाण शेख,दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे,भाजपा शहर उपाध्यक्ष बुढन शेख,नारायण जगताप,संजय चोपडा, मकरंद कुलकर्णी,केतन देवरे,सुभाष माळवतकर,सुमेर मिसर,असिफ शेख,राजाभाऊ भाबड,आनंद काकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे अनंता भामरे,राजेश घुगे, तौसिफ़ तांबोळी,मयूर माळी,कमलेश कलापुरे,ललित रसाळ,किरण उगलमुगले,गोविंद सानप,सचिन छाजेड, धीरज भाबड,मुकुंद झाल्टे,जीवन जगताप,ऍड राजेंद्र पालवे,दिपक साळुंखे,दिनेश घुगे,अमजद शेख,मिलिंद पाथरकर,किशोर गोसावी,विलास पगारे,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आंदोलनचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी,जलील अन्सारी व नितीन परदेशी यांनी केले.