सुषमा अंधारेंच्या त्या वक्तव्यावरून वारकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना दिला हा इशारा


वेगवान नाशिक

नाशिक : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वारकऱ्यांनी  चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकच्या काळाराम मंदिरापासून पायी दिंडी काढत अंधारे यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला असून आंदोलन करण्यात येत आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

दरम्यान सुषमा अंधारे यांनी एकनाथ महाराज आणि नामदेव महाराज यांच्या विषयी संदर्भ देत असतांना काही चुकीचे संदर्भ दिले असून त्याशिवाय रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार, आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं  असं वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी माफी मागूनही पुण्यानंतर नाशिकमधील वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

तसेच उद्धव साहेब सुषमा अंधारे यांची हकालपट्टी करा, गोदामाता अंधारेना सद्बुद्धी देवो, त्या ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला आम्ही वारकरी मतदान करणार नाही असंही वारकरी संप्रदायाच्या वतीने सांगण्यात आले असून उद्धव ठाकरे यांना इशारा देण्यात आला आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का, 11 माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *