शिंदे गटात सामील झालेल्या नेत्यांवर संजय राऊतांची जोरदार टीका


वेगवान नाशिक

मुंबईः सध्या शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी नाशिकचा दौरा केला असून या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. नाशिकमधील माजी उपमहापौरासह ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र शिंदे गटात प्रवेश केलेल्यांबाबत संजय राऊतांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

संजय राऊत म्हणाले की, जे शिंदे गटात गेलेत ते दलाल आहेत. एकतर त्यांचे जमिनीचे व्यवहार आहेत. २ नंबरचे धंदे आहेत. त्यांच्यावर पोलीस यंत्रणेचा वापर करून दबाव आणून प्रवेश करायला लावला आहेत, ज्याचे सरकार येईल त्यांच्याकडे जातात असा आरोप त्यांनी केला आहे.

हि बॅंक गृहकर्जावर देतेय एवढ्या टक्क्यांपर्यंत सूट

त्याचसोबत २०२४ ला हे सगळे झुंडच्या झुंड आमच्या दारासमोर उभे राहतील. फक्त गळ्यातील उपरणे बदलतील. ही राजकारणातील पद्धत आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची निष्ठा नाही. त्यामुळे ते गेलेल्यांचे दु:खं नाही. अगदी व्यवस्थित त्यांचा तपशील आम्ही देऊ शकतो. आणि ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा हे सगळे बेवा होतील आणि आमच्या दारात येतील. तेव्हा आम्ही घेणार नाही असं सडेतोड प्रत्युतर संजय राऊतांनी दिले आहे.

Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *