वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात सध्या ग्रामंचायतीच्या निवडणुकांची रणसंग्राम सुरु असून, प्रचाराचा धुरळा उडला आहे. त्यात राज्यातील ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!
याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच हे आदेश शासनाच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाने जारी केले आहेत. याशिवाय लोकशाही भक्कम करण्यासाठी आणि योग्य उमेदवार निवडण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण
तसेच ज्या खाजगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे शक्य नसेल त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना किमान २ तासांची सवलत द्यावी असे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही शासनाने आदेशात म्हटले आहे.
राज्यात हिंदुजा समूह ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार – मुख्यमंत्री