या चित्रपटावर हिंदू संघटनेची बंदी घालण्याची मागणी, अन्यथा..


वेगवान नाशिक

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिकाच्या पेहरावाला विरोध होत असून, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. केवळ हिंदू संघटनाच नाही तर काही मुस्लिम संघटनांनीही या चित्रपटाला विरोध केला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

या चित्रपटाला मुस्लिमांचा विरोध असल्याने पठाण हा चित्रपट खपवून घेणार नसल्याचे उलेमा बोर्डाने जाहीर केले आहे. या चित्रपटाविरोधात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीत निदर्शने होत आहेत.
त्याचबरोबर पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदू सेनेने केली आहे. या संदर्भात आम्ही सेन्सॉर बोर्डाला पत्रही लिहिले असून, त्याची दखल न घेतल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही आणि आमची संघटनाही तीव्र आंदोलन करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

हि बॅंक गृहकर्जावर देतेय एवढ्या टक्क्यांपर्यंत सूट

तसेच हिंदू सेनेने चित्रपटगृह मालकांना धमकी दिली आहे की, चित्रपट प्रदर्शित झाल्यास नुकसानीस ते स्वतः जबाबदार असतील. सेन्सॉर बोर्डाने जबाबदारीने वागावे, अन्यथा हिंदू सेनेला सेन्सॉर बोर्डाविरोधातही मोर्चा उघडावा लागेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

सुषमा अंधारेंचा राजीनाम्याची मागणीवरून भाजपला सवाल, म्हणाल्या..


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *