दिंडोरीः तालुक्यात एका वृद्धाची फसवणूक, १९ हजार ५०० रुपयाची रोकड लंपास


वेगवान नाशिक

दिंडोरीः शहरात एका वयोवृद्धाची फसवणूक झाल्याची घटना घडली असून १९ हजार ५०० रुपये लंपास केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गिन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव येथील विश्‍वनाथ एकनाथ बोंबले यांनी दिंडोरीतील भारतीय स्टेट बँकेतून आपल्या खात्यातून ५० हजार रुपये काढले असून ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत त्यांच्याच खात्यात भरण्यासाठी गेले असता तेथील बँक कर्मचार्‍यांनी खाते बंद झाले असून काही कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सांगितले. त्यानुसार बोंबले यांनी कागदपत्रांची पूर्तता केली.

Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

त्यानंतर पैसे भरणा करण्यासाठी स्लिप भरण्याबाबत बँक कर्मचार्‍यांनी सांगितले. त्यावेळी बोंबले हे बँकेची भरणा पावती लिहीत असतांना दोन युवक त्यांच्याजवळ आले आणि त्या नोटावरील नंबरही पावतीवर लिहावे लागेल म्हणून त्यांच्या हातातील पैश्यांचा बंडल फोडून हातचलाखीने १९ हजार ५०० रुपये या युवकांनी लंपास केले आहे.

याबाबत बोंबले यांना भरणा करतांना लक्षात आले असता तो पर्यंत संबंधित तरूणांनी बँकेतून पळ काढला होता. त्यानंतर बँकेतील सीसीटीव्ही तपासले असता संबंधित तरूणांनी वयोवद्ध बोंबले यांच्याकडून हातचलाखीने पैसे लंपास केल्याचे लक्षात आले. याबाबत बोंबले यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात चौकशी अर्ज दाखल केला असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कौवटे व पोलिस तपास करत आहेत.

ठाकरे गटाला मोठा धक्का, 11 माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *