BSNL 5G मध्ये या कंपन्यांना देणार टक्कर, जाणून घ्या ही सेवा कधी होणार सुरू


वेगवान नाशिक

नवी दिल्ली- भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला दूरसंचार विभागाकडून 62,000 कोटी रुपयांचे 5G स्पेक्ट्रम मिळणार आहे. हे या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने जाहीर केलेल्या 1.64 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजच्या व्यतिरिक्त असेल. याशिवाय, सरकार बीएसएनएलला 700 मेगाहर्ट्झ आणि 3.3 गीगाहर्ट्झमध्ये एअरवेव्ह वाटप करण्याचा विचार करत आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएनएलला 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 10 मेगाहर्ट्झसाठी सुमारे 40,000 कोटी रुपये आणि 3.60-3.67 GHz बँडमध्ये 70 मेगाहर्ट्झसाठी सुमारे 22,000 कोटी रुपये मिळतील. या स्पेक्ट्रम वाटपामुळे BSNL चांगली 5G सेवा प्रदान करू शकेल. विशेष म्हणजे, सब-GHz बँड विशेषत: टेलकोसला ग्रामीण भागात 5G सेवा देण्यासाठी मदत करेल. त्यामुळे BSNL लवकरच Tata Consultancy Services च्या नेतृत्वाखालील संघाच्या मदतीने भारतात 5G सेवा सुरू करणार आहे, ज्यात Tejas Network आणि Center for Development of Telematics यांचा समावेश आहे.

हि बॅंक गृहकर्जावर देतेय एवढ्या टक्क्यांपर्यंत सूट

अहवालानुसार, या प्रकरणातील एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, दूरसंचार विभागाच्या समितीने बीएसएनएलला 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 10 मेगाहर्ट्झ आणि 3.60-3.67 गीगाहर्ट्झ बँडमध्ये 70 मेगाहर्ट्झ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून शिवाय तो पुढे नेण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

खास बाब म्हणजे, बीएसएनएलला देण्यासाठी सरकारकडे 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये पुरेसा स्पेक्ट्रम असेल, कारण भारती एअरटेलने सांगितले आहे की भविष्यातील लिलावातही 700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळणार नाही. तसेच तज्ज्ञांचे मत आहे की 700 मेगाहर्ट्झ बँडमधील 10 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम एअरटेलसाठी योग्य आहे कारण ग्रामीण भागात 5G प्रदान करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण असेल.  BSNL चे 5G ऑगस्ट 2023 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *