सुषमा अंधारेंचा राजीनाम्याची मागणीवरून भाजपला सवाल, म्हणाल्या..


वेगवान नाशिक

मुंबईः  गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविषयी केलेल्या विधानांमुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या विधानांमुळे वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचं बोललं जात असून त्यांनी त्यासाठी जाहीर माफीही मागितली आहे. मात्र, तरीही काही वारकरी संघटनांकडून सुषमा अंधारेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

यावर सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या, भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही.

दरम्यान, यानंतरही त्यांना होणारा विरोध कायम असून त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये मोर्चाही काढण्यात आला. देहू पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. त्या म्हणाल्या मी माफी धारकऱ्यांची मागितलेली नाही. जे सच्चे वारकरी आहेत, जे कदाचित चुकून का होईना माझ्यामुळे दुखावले असतील, तर त्यांची माफी मागायला माझी काहीच हरकत नाही.

Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

तसेच जे माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ते सगळे स्वयंघोषित किर्तनकार भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मागणार आहेत का? ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला, त्या सगळ्यांचा राजीनामा मागणार आहेत का? मंगलप्रभात लोढावर बोलण्याची यांची हिंमत आहे का? यांची प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील किंवा भगतसिंह कोश्यारींवर बोलण्याची हिंमत आहे का? ते यांच्यावर अश्लिल भाषेत बोलू शकतात का?” असे परखड सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केले.

राज्यात हिंदुजा समूह ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार – मुख्यमंत्री

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *