रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, एवढ्या हजार पदांवर होणार भरती


वेगवान नाशिक

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी, भारतीय रेल्वेमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वेने बऱ्याच विभागांमध्ये अप्रेंटिस साठी २५२१ पदांवर भरती करण्यात येणार आहे. यात फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, तंत्रज्ञ अशा वेगवेगळ्या विभागात भरती केली जाणार आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्वाचा ठरणार!

यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया नुकतीच सुरू झालेली असून  शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३ आहे. या भरतीसाठी कोणतीही प्रवेश परिक्षा घेतली जाणार नाही. तसेच उमेदवार दिलेल्या अधिकृत  लिंकवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २५२१ पदे भरली जातील.
त्यात JBP विभाग – 884, बीपीएल विभाग – 614, कोटा विभाग – 685, WRS कोटा – 160, CRWS BPL- 158, मुख्यालय JBP- २०.

Share Market: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १० आणि आयटीआय कोर्समध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेद्वारांची निवड होणार आहे. याच मेरीटवर निवड करण्यात येईल.

वयोमर्यादा- उमेदवार १५ डिसेंबर २०२२ पर्यंत १५ ते २४ वयोगटातील असावा, या ओबीसी गटासाठी वयो मर्यादा १५ ते २७ असेल तर एससी, एसटी गटासाठी १५ ते २९ तर दिव्यांगांसाठी १५ ते ३४ वर्ष वयोगट मर्यादा आहे.

राज्यात हिंदुजा समूह ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार – मुख्यमंत्री

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *