वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,
अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –
मनमाड येवला रोडवरील सानप कॉम्प्लेक्स जवळ एका व्यक्तीला शारीरिक,मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन लोकांविरोधात मनमाड शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार अंत्या दळवी,रवी चव्हाण,मनोज चव्हाण यांच्याविरोधात भादंवि कलम 306,323,324, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय सरोवर हे करत आहेत.