वेगवान नाशिक
मुंबई: राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून वादंग निर्माण झाल असून राजकीय वातावरण चांगलचं चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात असून याविरोधात येत्या 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर
राऊत म्हणाले की, या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा असल्यामुळे 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,’ असा इशारा राऊतांनी दिला आहे.
Gold Price Today सोने झाले स्वस्त
तसेच पुढे म्हणाले की, ‘महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचे प्रकरण फार गंभीर असून घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंसारख्या महापुरुषांविषयी अपमानास्पद बोलत असेल आणि सरकार याचे खुले समर्थन करत असेल, तर हे अत्यंत निषेधार्ह आहे.
त्यामुळे याविरोधात मोर्चा का काढू नये? मोर्चा काढू नये असे वाटत होते, तर राज्यपालांना हटवायला हवं होतं. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. अजून ती कारवाई झालेली नाही, त्यामुळे आम्ही मोर्चा हा काढणारच,’ असंही संजय राऊत म्हणाले आहे.
राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट