वेगवान नाशिक
नाशिकः मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवशीय नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता असून यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या 226 कि.मी. लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण व कोनशिला अनावर रविवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता इगतपुरी येथे होणार आहे. याबाबत राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माहिती दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर
दरम्यान जिल्ह्यातील गोंदे ते प्रिंपीसदो फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे 20 कि.मी लांबीच्या 866 कोटींचे सहापदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी या 37 कि.मी लांबीच्या सटाणा ते मंगरूळ खंडाचे रूंदीकरण व दर्जोन्नतीकरणाच्या 439 कोटींच्या कामाचे, 10 वा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 येथे 4.3 कि.मी च्या 211 कोटी रूपयांच्या भुयारी व उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ खंबाळे ते पहिणे व शतगाव ते अंबोली या 30 कि.मी लांबीच्या 38 कोटींचे कामाचे मजबूतीकरण, गुरेवाडी फाटा ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे 9 कि.मी लांबी असलेल्या 14 कोटी किंमतीच्या खंडाचे मजबूतीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ मार्गावरील 53.500 कि.मी लांबीच्या मार्गावरील 11 कोटींच्या रस्ता सुरक्षा सुधार कार्य , तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पिंपळगाव-नाशिक-गोंदे या 51 कि.मी लांबीच्या मार्गावर 7.5 कोटी किमतीचे एलईडी पथदिवे लावणे या कामांच्या कोनशिलेचे आनावरण होणार आहे.
Gold Price Today सोने झाले स्वस्त
तसेच नांदगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे या 21 कि.मी लांबीच्या 253 कोटी रूपयांच्या खंडाचे रूंदीकरण व दर्जोन्ननतीकरणाच्या कामाचे लोकार्पण केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 18 डिसेंबर रोजी गार्डन व्ह्यू महिंद्रा प्रकल्पाजवळ, मुंबई -आग्रा महामार्ग इगतपुरी येथे करण्यात येणार आहे.
राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट