अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईबाबत राज्य शासनाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा


वेगवान नाशिक

मुंबईः शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला देणारी बातमी दिली असून अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच हेक्टरमर्यादाही वाढवून देण्यात आली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर

महसूल  विभागाने हा निर्णय जाहीर केला असून जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच
बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी १८ हजार ऐवजी आता मिळणार ३६ हजार रुपये मिळणार आहेत.

त्यात पूर्वी २ हेक्टरपर्यंत मदत केली जायची. मात्र, आता ही मर्यादा वाढवून दिली असून यापुढे तीन हेक्टरपर्यंत मदत केली जाणार असल्याचं शासन निर्णयात म्हटले आहे.

अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुहुर्तही ठरला

दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीकं आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २२२३२.४५ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली असून येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्याद्वारे करण्यात येणार आहे. त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट

 

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *