नाशिकः सरकारवाडा परिसरात कारचा अपघात, एकाचा मृत्यू


वेगवान नाशिक

नाशिकः सरकारवाडा परिसरात एका कारचा अपघात झाल्याची घटना घडली असून एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर

याबाबत अधिक माहिती अशी की, सरकारवाडा परिसरातील तिडके कॅलनी त्र्यंबक रोड येथे कारचा उपघात होऊन कार पलटी झाली असून गंभीर दुखापत झाल्याने एकाचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट

याबाबत योगेश कुमार शांताराम हयगळे यांनी पोलीस ठाण्याला दिलेल्या माहितीनुसार ईशान विपीन शुक्ला रा. स्नेहवर्दीनी बिल्डिंग क्लासिको अपार्टमेंट सदगुरू नगर सदाशिव नगर हे त्यांच्या मोटर कारने तिडके कॅालनी त्र्यंबक रोडने जात असताना एसटी एम्पोलायरच्या समोर डिव्हायडरवर त्यांची कार आदळली व ती पलटी झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना औषधोपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता डॅा. तपासून त्यांना मयत घोषित केले.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली असून पो. उपनि. पाटील  पुढील तपास करीत आहे.

Gold Price Today सोने झाले स्वस्त


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *