वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सध्या लाचखोरीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यात तीन घटना ताज्या असतानाच त्यात नाशिक शहरातील महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्यास 24 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर
दरम्यान नाशिक महानगर पालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या भाऊराव काळू बच्छाव या कर्मचाऱ्याने लाच स्वीकारली असून त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि १४ रोजी अटक करण्यात आली आहे.
राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट
माहितीनुसार, बच्छाव यांनी महापालिकेचे डांबरी रस्ते खोदून पलीकडे केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती २४ हजार रुपये देण्याचे ठरले.
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने शहानिशा करत सापळा रचत अंबड विभागीय कार्यालयाजवळील रोडवर लाच स्विकारताना पथकाने बच्छाव यास अटक केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुहुर्तही ठरला