अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुहुर्तही ठरला


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः मागील तीन महिन्यांपासून राज्यात नवं सरकार सत्तांतर झालं असून या सरकारच्या दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराला सातत्याने तारीख पे तारीखच मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र याबाबत सूत्रांकडून माहिती समोर आली असून महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर

राज्याचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशीरा भेट घेतली. त्यावेळी या मंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून अमित शहा यांनी मंत्रिमंडळ विस्तारास हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षात जानेवारी अखेरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. परंतु नव्या मंत्रिमंडळ विस्तारात किती मंत्र्यांना स्थान देणार याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला किती आणि कोणते मंत्रिपदे येणार याचीही माहिती देण्यात आलेली नाही.

Gold Price Today सोने झाले स्वस्त


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *