आर्थिक घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्या यांना क्लिनचीट


वेगवान नाशिक

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक नील सोमय्या आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणी आरोप होता. तर याप्रकरणी त्यांना मोठा दिलासा मिळाला असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणातून क्लिनचीट दिली आहे. त्यात  सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात दिली आहे. त्यामुळे याप्रकरणीचा अहवाल लवकरच कोर्टासमोर सादर होत सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर

दरम्यान भारतीय नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या आयएनएस विक्रांत युद्धानौका जीर्ण झाल्याने ती भंगारात काढण्याबाबत विचार सुरु होता. मात्र ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करत संग्रहायल रुपात जतन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, यावेळी भाजप खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्राने पुढाकार घेत मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी गोळा गेला. तेव्हा यातून सुमारे 57 कोटींचा निधा गोळा झाला. मात्र या निधीचा सोमय्या पितापुत्राने अपहार केल्याचा आरोप करत माजी सैनिक बबन भोसले यांनी 7 एप्रिल 2022 रोजी ट्रॉम्बे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सोमय्या पिता पुत्राविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 429, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट

याप्रकरणी सोमय्या पिता पुत्राने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली, मात्र सत्र न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी याचिका केली. त्यामध्ये कोणताही निधी गोळा झाला नसल्याचा दावा सोमय्यांच्या वतीने बाजू मांडताना केला गेला, यावर सोमय्यांनी किती रक्कम गोळा केली, त्याचा तपशील देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. यानंतर कोर्टाने विक्रांत बचाव अभियानाच्या माध्यमातून कशाप्रकारे निधी गोळा केला आणि कोठे गोळा केला याबाबत लेखी तपशील देण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले होते. मात्र पोलीस त्यात अपयशी ठरल्याने सोमय्या पिता पुत्रांना अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे.

या अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *