अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार- एकनाथ शिंदे


वेगवान नाशिक
मुंबई: मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली  मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान  एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते करण्यात आले असून या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी  शिंदे म्हणाले, मुंबई येथून सुरू झालेली ही थेट सेवा आतापर्यंतची सर्वांत लांब अंतराचा हवाई प्रवास आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन वेळेला ही सेवा असून त्यानंतर ती दररोज सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच  सॅनफ्रान्सिस्को आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असून भारतीय पर्यटकांना थेट सेवा फायदेशीर ठरणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ही थेटसेवा महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर  पंतप्रधानांमुळे महाराष्ट्राला देखील जी २० परिषदेच्या बैठकांचा मान मिळाल्याने राज्याच्या ब्रॅंडींगची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकतेच आम्ही राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून विमानतळ विस्ताराला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता राज्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करणार असून त्यामाध्यमातून हवाईसेवा जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
तसेच गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र आवडते ठिकाण असून थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्याने एअर इंडियाने युरोप आणि अमेरिकेतील महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *