बोम्मई यांनी केलेल्या विधानावरून अजित पवारांचा बोम्मईंवर निशाणा


वेगवान नाशिक

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे अस्मितेला धक्का लागला असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी बोम्मईंवर निशाणा साधला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे होतील दूर

दरम्यान याबाबच 17 डिसेंबरच्या महामोर्चासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी, ठरल्याप्रमाणे बोम्मईंनी वागलं पाहिजे. नाहीतर राज्याच्या एकात्मतेला धक्का लागेल. तसेच त्यानंतर अजित पवार पुढे म्हणाले, बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं, तर हा वाद वाढला नसता. आणि त्यांनी केलेल्या विधानामुळे हे सगळं प्रकरण घडल आहे.

राज्यातील या भागात अवकाळी पावसाचं संकट, हवामान विभागाचा अलर्ट

तसेही  कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केल्यामुळे  महाराष्ट्र सीमेवरील गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. सीमेवरील गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याचं मत व्यक्त केलं. ही भावना पण राज्याच्या दृष्टीने अडचण निर्माण करणारी आहे. कर्नाटकने समंजस भूमिका घेतली पाहिजे. दोन्ही बाजूंनी समजून घेणं गरजेचं आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Gold Price Today सोने झाले स्वस्त

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *