वेगवान नाशिक
गेल्या काही दिवसांपासून मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यामुळे सध्या वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत असून त्यातच आता महेश मांजरेकर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. महेश मांजरेकर यांना एका अपघातात आश्रमशाळेच्या संस्था चालकाविरोधात बदनामीकारक केलेल्या वक्तव्य भोवण्याची शक्यता असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!
दरम्यान गेल्यावर्षी पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकरांची गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली असल्याचा आरोप केला जात असून ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्था चालकाची होती. त्यावेळी महेश मांजरेकरांनी अरेरावी करत संस्थाचालकांविरोधात बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.
या बॅंकेच्या ग्राहकांना आनंदाची बातमी, मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ
याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. या तक्रारीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा या खेळाडूबाबत मोठा खुलासा