महाराष्ट्र सरकारने पोलीस दलात केले हे मोठे फेरबदल


वेगवान नाशिक

मुंबईः महाराष्ट्र सरकारने एका मोठ्या फेरबदलात,  मंगळवारी पुणे, अमरावती आणि नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांसह 30 भारतीय पोलिस सेवा अधिकाऱ्यांची पदोन्नती किंवा बदली केली आहे. याबाबत एका अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना महाराष्ट्राचे अतिरिक्त महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली असून त्यांच्या जागी रितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील, असे अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!

तसेच अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांची अतिरिक्त आयुक्त शस्त्रास्त्र (मुंबई पोलीस) म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी नवीन चंद्र रेड्डी यांची वर्णी लागली आहे. तर मोठ्या फेरबदलाचा एक भाग म्हणून, मिलिंद भारंबे हे बिपीन कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखालील नवी मुंबई पोलिस दलाचे नवे आयुक्त असतील. तसेच मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयाच्या आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे सदानंद दाते यांना दहशतवाद विरोधी पथक विशेष महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे.

Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पार

तर त्यांच्या जागी मधुकर पांडे हे एमबीव्हीव्हीचे नवे पोलीस आयुक्त असतील. तसेच विनयकुमार चौबे यांची पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांचीही बदली करण्यात आली असून मुंबईच्या वाहतूक विभागाची जबाबदारी प्रवीण पडवळ यांच्याकडे देण्यात आली आहे.
अशाप्रकारे मुंबई पोलीस दलातील चार सहआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे.

आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *