वेगवान नाशिक
भारत आणि बांगलादेश संघातील वनडेनंतरच्या दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर चट्टोग्राम येथे आज भारत आणि बांगलादेश सामना खेळणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेतली असून यादरम्यान त्याने संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!
पारस म्हांब्रे म्हणाले की, संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला त्याच्या नैसर्गिक आक्रमणाचा खेळ बदलण्याचा सल्ला देणार नाही. त्याला त्याची भूमिका आणि त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षांची जाणीव आहे. पंतने 31 सामन्यांमध्ये 5 कसोटी शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या संघांविरुद्ध शतके झळकावली असून पहिल्या कसोटीपूर्वी पंत नेटवर आक्रमक फलंदाजी करताना दिसला आहे.
महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता- एकनाथ शिंदे
तसेच म्हांब्रे यांना पंतच्या वृत्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘आम्ही ऋषभशी कोणतीही विशेष चर्चा केलेली नाही. ही त्याची खेळण्याची पद्धत आहे आणि आम्हाला ते माहित असून काहीही बदलले नाही. तो कसा खेळतो याबद्दल आम्ही कधीच बोलत नाही कारण संघाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे त्याला ठाऊक आहे.
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पार