नाशिकः पेठरोड परिसरात घरफोडी, १ लाख २१ हजार ४५० रूपये किमतीचा माल चोरी


वेगवान नाशिक

नाशिकः समर्थ नगर पेठरोड परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने १ लाख २१ हजार ४५० रूपये किमतीचा माल चोरून नेला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!

याबाबत अधिक माहिती अशी की, समर्थ नगर इंद्रप्रस्त नगर पेठरोड दवनी फाटा नाशिक या ठिकाणी पांडुरंग  कांबळी यांचे राहत्या घराचे हॅालच्या खिडकीतून कोणीतरी अज्ञात आरोपी याने तीन गज कापून घरात प्रवेश करून घरातील कपाटातून एकूण १ लाख २१ हजार ४५० रूपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व दोन गॅस सिलिंडर घरफोडी करून चोरून नेले आहे.

आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

म्हणुन अज्ञात विरूद्ध म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पो. नि. धमाळ, सहाय्यक पो. नि. पाटील, पो. उपनिरिक्षक. घडवजे यांनी घटनास्थळी भेट देत अधिक माहिती जाणून घेतली असून याबाबत अधिक तपास करत आहे.

नाशिकः शेतात आढळले २ बिबट्याचे पिल्ले


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *