नाशिकः राष्ट्रवादीच्या या महिला नेत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात सध्या गुन्हेगारांचे प्रमाण वाढले असून प्राणघातक हल्ल्यांसारखे प्रकार घडताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या नाशिकमधील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!

माहितीनुसार, मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या त्या कन्या आहेत. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन शिवारात प्राची पवार या त्यांच्या फार्म हाऊसमध्ये गेल्या असताना  दि. १३ रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अज्ञात टोळक्याने डॅा. प्राची पवार यांच्यावर हल्ला केला असून यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यानंतर पवार यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान अज्ञात हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपून बसले असून प्राची पवार या दुचाकीवरून फार्म हाऊसजवळ आल्या असता, त्यांनी या लोकांना गाडी काढण्यासाठी सांगितलं. तेव्हा, या हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्राने प्राची यांच्यावर हल्ला करून तेथून पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी  सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं असून पुढील तपास पोलिस  करत आहेत.

Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पार

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *