वेगवान नाशिक
सध्या महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून त्यावरून मंत्र्यामधून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. त्यात सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असून ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांना नक्कीच एक भेटवस्तू मिळणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!
याबाबत ते सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गुजरात निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यामुळेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले. मात्र चार लाख लोकांचा रोजगार गेला तरी केंद्राच्या सांगण्यावरून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्री काही बोलत नाहीत, कारण दोघे आदेश पाळणारे आहेत, अशी टीकाही जयंत पाटीलांनी केली आहे.
आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
तसेच सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही आमच्याच सरकारची जुनी योजना असून योजना पारदर्शक कशी होईल, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. मागच्या जलयुक्त शिवारमध्ये काही त्रुटी राहिल्या, तसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असेही पाटील म्हणाले आहे.
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पार