चांदवडः तालुक्यात १० हजारांची लाच घेताना उपकोषागार एसीबीच्या जाळ्यात


वेगवान नाशिक

नाशिक: जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने घडत असून घटनांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यात दोन दिवसात लाचखोरीच्या दोन घटना ताज्या असतानाच  जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात लाचखोरीची घटना समोर आली असून वर्ग 2 च्या अधिकाऱ्यास दहा हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!

माहितीनुसार,चांदवड शहरातील खंडेराव महाराज मंदिर रोड परिसरात राहणाऱ्या सुनील तडवी हा कोषागार कार्यालयात वर्ग 2 च्या पदावर कार्यरत आहे.  यातील तक्रारदार यांचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि कोणताही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष 15 हजार रुपये लाचेची मागणी केली असून तडजोडीअंती 10 हजार लाचेची मागणी केल्याचं उघड झालं आहे. सुनील सुभान तडवी या अधिकाऱ्यास लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पार

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत सदर मागणी केलेली 10 हजार रुपयांची लाच सुनील तडवी याने पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणा  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पोलिस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव-पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *