वेगवान नाशिक
चांदवडः येथील गजानन इलेक्ट्रॉनिक्स या दुकानास भयंकर मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. दि. १२ रोजी रात्रीच्या सुमारास अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान रेणुका कॉम्प्लेक्समधील डुंगरवाल पतसंस्थेसमोरील ज्ञानेश्वर पवार यांच्या गजानन इलेक्ट्रॉनिक्स या दुकानास अचानक आग लागल्याने सुमारे २४ ते २५ लाखांचे नुकसान झाले असून टीव्ही, व्हीसीआर, एलसीडी व इलेक्ट्रॉनिक वस्तु जळून खाक झाल्या आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुकानात एलईडी टीव्ही, होमथिएटर, कारटेप, बॅटरी, रिमोट, मिक्सर यासारख्या अनेक वस्तूंचे नवीन व रिपेरिंग करण्याच्या वस्तू होत्या. त्यात जवळच फर्टीलायझर्सचे छोटेसे गोडाऊन आहे. त्याला देखील आगीचा चांगलाच फटका बसला असून कृषीचे औषधे जळून खाक झाली आहे. हि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
याबाबत समजताच पवार यांनी दुकानाकडे धाव घेत चांदवड टोलप्लाझा येथील अग्निशमन दलास कळविले आहे. त्यानंतर टोलप्लाझा अग्निशमन बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. परंतु, आगीने इतका भडका घेतला होता की, आग विझून देखील सर्व मालाचा कोळसा झालेला होता. यात एलईडी टीव्ही, स्पीकर, साउंड सिस्टिम, ॲम्प्लिफायर, होमथिएटर, कारटेप, बॅटरी, रिमोट, सीलिंग फॅन, टेबल फॅन, मिक्सर, इस्त्री, लहान मोठे केबल बंडल व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश असून सर्व वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच चांदवड तलाठी जैस्वाल, वीज वितरण कंपनीचे अभियंता व इतर कर्मचारी, पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर आदींनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा या खेळाडूबाबत मोठा खुलासा