वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात सध्या सातत्याने वादाचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात या ना त्या कारणावरून, विधानांवरून सारखे वाद निर्माण होताना दिसत आहे. अशातच अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला असून हे सरकार आल्यापासून नवीन समस्या निर्माण करायच्या व बेरोजगारी व महागाई या महत्त्वाच्या प्रश्नावरुन दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच काम राज्यसरकारचे सुरू आहे,असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!
अजित पवार म्हणाले, राज्यात जून महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. हे सरकार कसे आले? का आले? यामध्ये मला रस नाही. पण सत्तेवर आल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी थांबायला सुरूवात झाली आहे. कुठलंही सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकाभिमुक कारभार करण्याचा प्रयत्न करत असते. विकासाच्या कामाला महत्व दिले जाते. राज्यात शांतता कशी नांदेल आणि कायदा सुव्यवस्था कसा चांगला राहिल याचा प्रयत्न केला जातो. मात्र, हे सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत सातत्याने काहीना काही नवीन वाद काढले जात असून नवीन समस्या निर्माण केल्या जात आहेत.
जर तुम्हाला विमा पॉलिसीचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर आजच करा हे काम, अन्यथा..
तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचा महत्वाचा प्रश्न असून यांसारख्या अनेक महत्वाच्या प्रश्नांकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पवार पुढे म्हणाले, साहित्य, संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या समितीने निवड केलेल्या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे त्यात सरकारने हस्तक्षेप करणे गैर आणि निषेधार्ह आहे असे स्पष्ट करतानाच त्यात राजकीय लोकांनी अजिबात ढवळाढवळ करायची नसते” अशा शब्दांत सुनावले देखील आहेत. तसेच त्याशिवाय, जर राज्याच्या हिताचे असेल, राज्याच्या एकसंघतेला कुठे धक्का लावणारा असेल किंवा आणखी काही करणारा असेल, देशद्रोही काम झाले असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण जी समिती होती ती महाराष्ट्रातील आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केला असेल अभ्यास केला असेल ना? एका संबंधित मंत्र्यांचे लंगडं समर्थन आहे. त्यामुळे पुन्हा सांगतो हा अनुवाद आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा या खेळाडूबाबत मोठा खुलासा