वेगवान नाशिक
आजकाल बरेच जण रेल्वेच्या प्रवासास जास्त सोयीचे मानता. कारण लांबच्या प्रवासाकरता रेल्वे परवडणारी , वेळेत पोहण्याची हमी आणि सुरक्षित प्रवास देणारी असते. त्यामुळे प्रवासासाठी पहिली पसंती ही रेल्वेलाच असते. परंतु केंद्रीय रेल्वेमंत्र्याने रेल्वे प्रवाशांना एक धक्का देणारी बातमी दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये जाण्याची संधी!
केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना तिकीट दरवाढीचे संकेत दिले असून येत्या काळात तिकीट दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच लोकसभेत रेल्वेमंत्र्यांना कोविडआधी वरिष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत पुन्हा सुरु करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असून त्यावर सद्यपरिस्थितीत प्रत्येक प्रवाशाला 55 टक्के सवलत दिली जात असल्याचं वैष्णव म्हणाले आहे.
या बॅंकेच्या ग्राहकांना आनंदाची बातमी, मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ
दरम्यान प्रत्येक प्रवाशाच्या प्रवास भाड्यावर रेल्वे प्रति किमी 1 रुपये 16 पैसे खर्च होतात. तर रेल्वे यासाठी फक्त 45 ते 48 पैसे आकारते. त्यात गेल्या वर्षात प्रवासी भाड्यावर रेल्वेकडून 59 हजार कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे. तसेच प्रवाशांना रेल्वेकडून चांगल्या सुविधा देण्यात भर दिला जात असून नवी रेल्वे सेवा, रेल्वे मार्गाचं विस्तार अशा सेवांकडे भर दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करायला हवा, असं रेल्वे मंत्र्यांनी नमूद केलं आहे.
तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी येत्या काळात चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. पण भाडेवाढीच्या संकेतासह भविष्यात आणखी काही निर्णय घेतली जातील, अशी पूर्वकल्पनाही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पार