वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,
अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय शालेय 17 व 19 वर्षे मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील 8 विभाग व राज्य क्रीडा प्रबोधिनीच्या 160 खेळाडूंनी दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर होणाऱ्या स्पर्धेत कमालीची चुरस निर्माण केली होती.
मनमाड येथील जयभवानी व्यायामशाळेच्या व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी साक्षी भाऊसाहेब वानखेडे हिने 59 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.55 किलो वजनी गटात पूजा श्याम वैष्णव हिने रौप्यपदक पटकावले तर छत्रे हायस्कूलच्या आनंदी विनोद सांगळे हिने 71 किलो वजनी गटात तिच्या पहिल्याच सहभागात राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक,श्रावणी विजय पुरंदरे हिने 49 किलो वजनी गटात कांस्यपदक, करिष्मा रफिक शाह हिने 76 किलो वजनी गटात कांस्यपदक,सरस्वती विद्यालयाच्या पूर्वा दीपक मौर्य व छत्रे विद्यालयाच्या दिव्या उपेंद्र सोनावणे,श्रावणी वाल्मिक सोनार या खेळाडूंनी चतुर्थ क्रमांक मिळवीत समाधानकारक कामगिरी बजावली.
या यशामुळे खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सर्व खेळाडुंना श्री.प्रविण व्यवहारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.