नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार


वेगवान नाशिक

सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे ब-याच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारवरून नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा राजकीय वर्तुळात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. नितेश राणे यांनी आम्हाला मतदान केले नाही तर निधी देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी केली आहे.

त्या विधानाबाबत अखेर चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी

दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत. त्यामुळे आम्हाला मतदान केले नाही, तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही, अशी धमकी आमदार नितेश राणे यांनी दिली होती. राणेंच्या विरोधात आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना करण्यात आली असून  गुन्हा दाखल न झाल्यास नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तसेच राणे यांच्या या  वक्तव्यामुळे नांदगाव ग्रामस्थांमध्ये भयंकर चीड व दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार आहे.

या स्टॅाकने गुतवणुकदारांना दिला जबरदस्त परतावा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *