वेगवान नाशिक
नाशिकः सोमवार बाजार पेठ देवळाली गाव नाशिकरोड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली निलेश चव्हाण या भाजीपाला घेण्यासाठी सोमवार बाजार पेठ देवळाली गाव नाशिक याठिकाणी गेल्या असता बाजारात गर्दी असल्याचा फायदा घेत दोन अनोळखी महिला पंजाबी ड्रेस घातलेले व निळ्या रंगाची बॅग त्यांच्या हातात होती. त्यापैकी एका महिलेचे डाव्या पायाचा अंगठा तुटलेला होता. असं वर्णन असलेल्या दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील एकूण ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची चैन संगनमत करून त्यांची संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेली आहे.
ब्रेकिंग! ठाकरे गटाची ती मागणी न्यायालयाने फेटाळली
म्हणून याप्रकरणी दोन अनोळखी महिला यांच्या विरूद्ध उपनगर पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून याबाबत वरिष्ठ पो. नि. माईनकर, सहाय्यक पो.नि.सागर डघळे, पो. नाईक लखन गुन्हे शोध पथक यांनी गटनास्थळी भेट देत अधिक माहिती जाणून घेतली असून याबाबत सहाय्यक पो. उप नि. कोकाटे अधिक तपास करत आहे.
IND vs BAN पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला मिळणार संधी?