मालेगावः शहरात अवैध गौण खनिज चोरी करणा-या दोघा संशयितांस अटक


वेगवान नाशिक

मालेगाव : शहरात सध्या गिरणा, मोसम नदीपात्रातून ट्रॅक्टर व बैलगाडीद्वारे अवैध वाळू उपसा करुन गौण खनिज चोरी व विक्रीचा प्रकार सुरू असल्याचा प्रकार उघड झाला असून गुन्हेगारांविरोधात मालेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार मोहिम सुरु केली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा

याबाबत दि ११ रोजी मध्यरात्री महसूल अधिकारी, कर्मचारी सुटीवर असल्याची संधी साधून अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन ब्रास वाळू असा सुमारे अकरा लाखाचे साहित्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवारवाडी पोलिसांच्या सहकार्याने जप्त केला असून या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

अधिक माहिती अशी की, शहरातील मदनीनगर भागात अवैधरित्या विना परवाना चोरुन आणलेली वाळू जमाल अन्सारी यांच्या यंत्रमाग कारखान्याजवळ खाली करण्याच्या प्रयत्नात असताना छोटू उर्फ राजू सोनवणे (वय २४, रा. म्हाळदे कॉलनी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली असून त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली, एक ब्रास वाळू असे सुमारे साडेपाच लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

त्यानंतर पवारवाडी पोलिस ठाण्यात योगेश कोळी यांच्या तक्रारीवरुन गौण खनिज चोरी व विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी किरण सोनवणे (वय २५, रा. हिम्मतनगर, कॅम्प) याला अटक करण्यात आली आहे.

निर्भया फंडातून खरेदी केलेल्या वाहनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने डीजीपींना केली ही मागणी

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *