वेगवान नाशिक
मुंबई : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात उद्यापासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे दोन कसोटी सामने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच केएल राहूल याच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकावर कोणता खेळाडू येणार आणि कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा
दरम्यान इंग्लंडने पाकिस्तान टीमचा दोनदा पराभव केला असल्यामुळे टीम इंडिया बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. तसेच जर टीम इंडियाने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिका जिंकल्या तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फायनलपर्यंत पोहचू शकते.
त्यात नव्या खेळाडूंना कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवायचं याचा निर्णय केएल राहूल आणि राहूल द्रविड घेणार आहे. त्यामुळे टीम इंडियात एक नवा बदल पाहायला मिळणार आहे.
ब्रेकिंग! ठाकरे गटाची ती मागणी न्यायालयाने फेटाळली
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
1. केएल राहुल (कर्णधार), 2. शुभमन गिल, 3. चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), 4. विराट कोहली, 5. श्रेयस अय्यर, 6. ऋषभ पंत (विकेटकीपर), 7. रविचंद्रन अश्विन, 8. अक्षर पटेल , 9 मोहम्मद सिराज, 10. उमेश यादव, , 11. जयदेव उनाडकट / नवदीप सैनी