वेगवान नाशिक
मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटात परस्पर हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात एकनाथ शिंदे गटाचे दोन गट एकमेकांना भिडले. ही घटना ठाण्यातील उल्हासनगर भागातील असल्याचे सांगण्यात येत असून, येथे एकनाथ शिंदे गटाच्या दोन गटात आपसातील वादातून जोरदार हाणामारी झाली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा
मिळालेल्या माहितीनुसार, एक गट उल्हासनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवून होता, त्यावेळी दुसऱ्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला आणि काही वेळातच जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत काही जण जखमी झाल्याचे समजते. सध्या याप्रकरणी पोलिसांची एन्ट्री झाली असून ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या भांडणाचे खरे कारण समोर आलेले नाही.
दरम्यान याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला असून सहायक आयुक्त मोतीचंद राठोड यांनीही घटनेचा आढावा घेतला. परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी