शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी


वेगवान नाशिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली असून एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी ग्रामदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा

दरम्यान धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन देशी कट्ट्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या पोलिसांच्या फोन ऑपरेटरने पोलिसांकडे यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत. कालच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला असून त्यांनंतर आज त्यांना आलेल्या धमकीच्या फोनमुळं मोठी खळबळ उडाली आहे.

निर्भया फंडातून खरेदी केलेल्या वाहनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने डीजीपींना केली ही मागणी

याप्रकरणी  पोलीस ऑपरेटरने धमकी संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून त्यानंतर रामदेवी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या स्टॅाकने गुतवणुकदारांना दिला जबरदस्त परतावा

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *