वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत न्यायालयात याचिका सुरू असून या याचिकेवर तारीख पे तारीख असंच सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली असून यावर उद्धव ठाकरे गटाकडून 7 न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा
मात्र ठाकरे गटाची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली असून ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानला जात आहे. तर या मागणीची पुढील सुनावणी 10 जानेवारीला पार पडणार आहे.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हा खटला सात न्यायाधीशांसमोर चालवण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी आज फेटाळली आहे. यासंदर्भात सविस्तर आणि रितसर मागणी करण्याच्या सूचना कोर्टाने ठाकरे गटाला दिल्या आहेत. कपिल सिब्बल आता लेखी स्वरुपात ही मागणी सादर करतील असे सांगितले जात आहे.
नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार