वेगवान नाशिक
महाराष्ट्रात बरेच जण सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त अजून काही सुट्ट्यांची वाट पाहत असतात. अशातच राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी दिली आहे. सध्या हे वर्ष काही दिवसात संपणार असून नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्याआधीच राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं असून त्या दोन दिवसांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा
दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नागरिक दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणांच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. तर राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणांच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हि खास भेट असणार आहे.
येत्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये दहीहंडी 7 सप्टेंबर रोजी तर, अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर रोजी असणार असून या दिवशी मुंबई आणि उपनगरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद राहतील, असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच यामध्ये आणखी काही सुट्ट्यासुद्धा नव्या वर्षात तुमची वाट पाहत आहेत. चला तर, मग पाहुया 2023 मधील सुट्ट्यांची यादी.
ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना संबंधीत सुनावणी लांबणीवर, या तारखेला होण्याची शक्यता
26 जानेवारी- प्रजात्ताक दिन, 18 फेब्रुवारी- महाशिवरात्री, 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 7 मार्च – होळी, 22 मार्च- गुढीपाडवा, 30 मार्च – रामनवमी, 4 एप्रिल – महावीर जयंती, 7 एप्रिल- गुड फ्रायडे, 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे- महाराष्ट्र दिन, 5 मे- बुद्धपौर्णिमा, 28 जून – बकरी ईद, 29 जुलै- मोहरम, 15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन, 16 ऑगस्ट- पारसी नववर्ष, 19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी, 28 सप्टेंबर – ईद ए मिलाद, 2 ऑक्टोबर- गांधी जयंती, 24 ऑक्टोबर – दसरा, 12 नोव्हेंबर – दिवाळी लक्ष्मीपूजन, 27 नोव्हेंबर – गुरुनानक जयंती, 25 डिसेंबर – नाताळ.
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! १८ वर्षांनंतर या समूहाचा IPO येणार बाजारात