वेगवान नाशिक
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील 13 बँकांना दंड ठोठावला असून यामध्ये महाराष्ट्रातील काही बँकांचाही समावेश आहे. आरबीआयने म्हटलं की, नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला असून या बँकांवर 50 हजार रुपयांपासून ते 4 लाखांपर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार जपून करा
दरम्यान या बँकेने श्री कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर, यांना सर्वाधिक 4 लाख रुपये आणि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बीड यांना अडीच लाख रुपये दंड ठोठावला आहे. तर वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा आणि इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँक, इंदूर यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
IND vs BAN पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला मिळणार संधी?
याशिवाय पाटण नागरी सहकारी बँक, पाटण आणि द तुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मेघालय यांना वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून अन्य काही बँकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात नागरीक सहकारी बँक मर्यादीत, जगदलपूर, जिजाऊ व्यावसायिक सहकारी बँक, अमरावती, ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑप बँक, कोलकाता; जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, छतरपूर; नागरीक सहकारी बँक मर्यादीत, रायगड; जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, बिलासपूर; आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, शहडोल यांनी सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.
तर याचा बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर या दंडात्मक कारवाईचा परिणाम होणार नसून ग्राहकांना कोणताही आर्थिक तोटा सहन करावा लागणार नसल्याचं बॅंकेनं सांगितलं आहे.
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! १८ वर्षांनंतर या समूहाचा IPO येणार बाजारात