या स्टॅाकने गुतवणुकदारांना दिला जबरदस्त परतावा


वेगवान नाशिक

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसत आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी आहे. पण गुंतवणूक वाढत असतांना त्याच्या परताव्याबाबत अनेकांना शंका असते. छोट्या-मोठ्या अनेक कंपन्यांचा तोटाही अनेकदा गुंतवणूक दारांना सहन करावा लागतो. त्यामुळे शेअर बाजारात होणारे चढ-उतार अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा

अशातच  नुकतेच सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनी तिच्या परताव्यावरुन चर्चेत आली आहे. सन्मित इन्फ्रा स्टॉकने चार वर्षात मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात या कंपनीची चर्चा असून एक रुपयाच्या स्टॉकला 5900 टक्के इतका परतावा दिला आहे. त्यामुळे शेअर बाजारात सध्या या कंपनीची चर्चा सुरू आहे.

Gold Silver Price Today सोने चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा

दरम्यान सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीच्या 1 रुपये 31 पैशांच्या शेअर्सची किंमत 78 रुपये 75 पैशे इतकी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक दारांच्या नशिबाने कलाटणी घेतल्याचे बोललं जाऊ लागले आहे. तसेच या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मागील महिन्यात आठ टक्के इतकी वाढ झाली असून  या कंपनीच्या शेअर्सचा दर हा मागील महिन्यात फक्त 42 रुपये इतका होता.

त्यात सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीने सहा महिन्यात 90 टक्के इतका परतावा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात तब्बल 160 टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. तर एक लाखाची ज्यांनी वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती त्यांना आता 60 लाखाहून अधिकचा परतावा मिळाला आहे.

मोठी बातमी! देशात पुन्हा नोटबंदी, ही नोट बंद होणार?

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *