नाशिकः शहरात अपघातांचे सत्र सुरूच, वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात सध्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशातच दोन दिवसांत दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून त्यात दोन जणांचे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात नागरिकांना रोडवरून ये जा करताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा

दरम्यान सदर घटनेतील पहिली घटना ही म्हसरुळ मखमलाबाद लिंक रोड परिसरात घडली असून एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. संतोष बाळकृष्ण चारोस्कर (वय २९, गुलमोहर बिल्डींग, मखमलाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि ९रोजी रात्री आठच्या सुमारास प्रभातनगर भागात दुचाकीस्वार त्याच्या ॲक्टीव्हावरून (एमएच १५ ईआर ६६२३) म्हसरुळ मखमलाबाद रोडवरून प्रभातनगर भागातून जात असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने समोरून धडक दिल्याने संतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी मृताचा आतेभाऊ राहुल खंडेराव तांदळे यांच्या तक्रारीवरून म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. माळी तपास करीत आहेत.

Gold Silver Price Today सोने चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा

त्यानंतर सदर घटनेतील दुसरी घटना ही जेल रोड इंगळेनगर जेल टाकी परिसरात घडली असून वाहनाच्या धडकेत स्कुटी चालक श्रीकांत विजय साबळे (वय ४५, नंदनवन हाउस, अपूर्वा कॉलनी टाकळी जवळ) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.९ रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास श्रीकांत साबळे हे राकेश अशोक साबळे यांना भेटण्यासाठी त्यांच्या ॲक्टीव्हावरून (एमएच १५ जीएन ५९७१) जेल रोड पाण्याच्या टाकीजवळ येत असताना त्यांची ॲक्टीव्हा कॅनाल रोड कडे वळत असताना नांदूर नाक्याकडून धरधाव वेगात आलेल्या कारने साबळे यांच्या ॲक्टीव्हाला धडक देत फरफटत नेत जखमी केले आहे.

त्यानंतर साबळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, पहाटेच्या सुमारास डॉ. राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *