नाशिकः अवैध शस्त्रसाठा बाळगणा-या संशयित गुन्हेगारास अटक


वेगवान नाशिक

नाशिकः शहरात अवैध शस्त्रसाठा बाळगणारे गुन्हेगार सर्रास फिरताना दिसत असून गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच    गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका संशयित गुन्हेगारास नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा सुमारे 25 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विष्णू गोसावी व सागर आडणे यांना गुप्त माहिती मिळाली की, एक सराईत गुन्हेगार सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ पिस्तोल घेऊन फिरत आहे. त्यानुसार ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामनगाव रोडवर असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ सापळा रचत संशयित गुन्हेगारचा पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

मोठी बातमी! देशात पुन्हा नोटबंदी, ही नोट बंद होणार?

त्यानंतर त्याची चौकशी केली असून अक्षय गणेश नाईकवाडे असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता  त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूलसह एक जिवंत काडतूस आढळून आले आहे. याप्रकरणी पोलीस शोध पथकासह सर्व पोलिस  कर्मचा-यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Gold Silver Price Today सोने चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *